प्रतिनिधी/ रत्नागिरी
विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आधारित ‘तरुण भारत’ आयोजित ‘कोण नेता- कोण विजेता’ या प्रश्नमंजूषा स्पर्धेचा पारितोषीक वितरण समारंभ मंगळवार दि. 21 रोजी होणार आहे. रत्नागिरीतील मारुती मंदिरनजीकच्या जोगळेकर हॉलमध्ये सकाळी 11.00 वा. होणाऱया विशेष समारंभात स्पर्धेचे प्रायोजक व अन्य मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत प्रथम विजेत्यासाठी होडा ऍक्टीव्हाआय चे बक्षीस मिळणार आहे.
विधानसभा निवडणूक 2019 मध्ये राज्यात कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील, मुख्यमंत्री कोण होईल, जिह्यात सर्वाधिक मतांनी कोण विजयी होईल यासह जिह्यातील सर्व मतदार संघातील विजयी उमेदवारांबद्दल अंदाज व्यक्त करणारी प्रश्नमंजूषा स्पर्धा ‘तरुण भारत’तर्फे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून या स्पर्धेत तब्बल 7329 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यातील अचूक उत्तरे असणाऱया 679 स्पर्धकांमधून स्पर्धेच्या प्रायोजकांच्या हस्ते लकी-ड्रॉ पध्दतीने एकूण 155 भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात आली. 19 डिसेंबरच्या ‘तरुण भारत’मधून विजेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती.
कुवारबाव येथील प्रसन्न लाड या स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी रत्नागिरीतील जागृत होंडाने पुरस्कृत केलेल्या होडा ऍक्टीव्हा आयचे मानकरी ठरले आहेत. तर पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स यांच्यातर्फे द्वितीय क्रमांकासाठी देण्यात येणाऱया 15 हजारांच्या गिफ्ट व्हाऊचर जिंकण्याचा मान चैत्राली हरिश्चंद्र पेंडुरकर (नाणार, राजापूर) यांनी, तिसऱया क्रमांकासाठीची महालक्ष्मी आटा चक्की मिळवण्याचा मान संकेत सुरेश गवळी (सावर्डे – चिपळूण) यांनी, अरिहंत कन्स्ट्रक्शन, रत्नागिरी प्रायोजित वॉशिंग मशिनचे चौथ्या क्रमांकासाठीचे बक्षीस क्षमिका कमलेश कोकाटे (खेंड, चिपळूण) यांनी आणि पाचव्या क्रमांकासाठीचा महाकाली इलक्ट्रॉनिक्स प्रायोजित मायक्रोवेव्ह ओव्हन नीशा उमेश राजेशिर्के (राऊत आळी, चिपळूण) यांनी जिंकला आहे. या शिवाय खातू मसालेकडून 50 जणांना गिफ्ट हॅम्पर, कॉम्प्युटर कन्सेप्ट रत्नागिरीकडून 30 पेन ड्राईव्ह, प्रवीण ट्रेडर्स रत्नागिरीकडून 10 फ्राय पॅन, मलुष्टे स्टोन क्रशरकडून 10 इस्त्राr व लायन्स क्लब ऑफ न्यू रत्नागिरीकडून 50 वॉल क्लॉक अशी 150 बक्षीसेही यावेळी प्रदान केली जाणार आहेत.
या विजेत्यांना मंगळवारी 21 जानेवारी रोजी सकाळी 11 वा. आयोजित विशेष कार्यक्रमामध्ये बक्षीसे प्रदान करण्यात येणार आहेत. रत्नागिरीतील मारूती मंदीर नजीकच्या जोगळेकर हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. विजेत्या स्पर्धकांनी बक्षीस स्विकारण्यासाठी येताना आपल्या ओळखीचा पुरावा किंवा प्रवेशपत्रामध्ये नोंदविलेला क्रमांक असणारा मोबाईल जवळ बाळगणे आवश्यक आहे. स्पर्धकाच्या ओळखीची खात्री झाल्यावरच बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. या बक्षिस वितरण समारंभात वेळेत उपस्थित राहून आपापली बक्षिसे स्विकारावीत असे आवाहन ‘तरुण भारत’ परिवार व प्रायोजकांमार्फत करण्यात आले आहे.









