18 हजाराची लाच घेताना एजंटलाही एसीबीकडून अटक
प्रतिनिधी / बेळगाव
एका शेतकऱयाकडून 18 हजार रुपयांची लाच घेताना कोण्णूर (ता. गोकाक) येथील तलाठी एसीबीच्या जाळय़ात अडकला आहे. गुरुवारी एसीबीच्या अधिकाऱयांनी त्याला रंगेहाथ पकडले असून त्याच्या एजंटालाही अटक झाली आहे.
कोण्णूर येथील महावीर बाबागौडा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एसीबीचे पोलीसप्रमुख बी. एस. नेमगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक जे. एम. करुणाकर शेट्टी, पोलीस निरीक्षक एच. सुनीलकुमार व त्यांच्या सहकाऱयांनी गुरुवारी ही कारवाई केली आहे.
तलाठी मारुती शिगीहोळीसह त्याने लाच स्वीकारण्यासाठी ठेवलेला एजंट रमेश आण्णाप्पा हंपन्नावर या दोघा जणांना 18 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. मुरगोड येथेही उपनोंदणी खात्याच्या एका अधिकाऱयाला बुधवारी अटक झाली होती.
अधिकाऱयांच्या माहितीनुसार महावीर पाटील यांचे वडील बाबागौडा यांचे निधन झाले आहे. कोण्णूर येथे एका सर्व्हे क्रमांकामध्ये 2 एकर 23 गुंठे व प्रत्येक 1 एकरांचे दोन डाग या जमिनींच्या उताऱयावरील वडिलांचे नाव कमी करून महावीर यांच्या भावाचे नाव नोंदविण्यासाठी तलाठय़ाने 18 हजारांची मागणी केली होती.