प्रतिनिधी / वारणानगर
खासदार धैर्यशील माने यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन कोडोली उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्या त्वरीत सोडवण्याची मागणी पत्राद्वारे केली.
कोडोली ता. पन्हाळा येथील ५० बेड असलेल्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये वैद्यकीय व अवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात, या रुग्णालयाच्या इमारतीला ७० टक्के गळती लागली असून दुरुस्ती तात्काळ करून घ्यावी व रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर, मल्टीप्यारा, पल्स ऑक्सीमिटर, ओटु सेंटर या सुविधा सुरू करण्याबाबत खासदार धैर्यशील मानेंनी आरोग्यमंत्री टोपे यांच्याकडे भेटून पत्राद्वारे केली आहे. तर या मागण्या लवकरच मार्गी लावीन, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खासदार धैर्यशील माने यांना आश्वासन दिले आहे.
या कामी विरेंद्र पाटील, नयन गायकवाड, शैलेंद्र पिसाळ, अंकुश रोकडे, संजय निकम, अमोल पाटील, स्वप्नील पाटील, नितीन माने, राया रोकडे, रणजीत पाटील (वारणा), जयदेव पाटील, सामाजिक कार्यकर्ते यांनी या कामी निवेदन देऊन सातत्याने प्रयत्न केले आहेत.