प्रतिनिधी / वारणानगर
कोडोली ता. पन्हाळा येथे कोरोना रोगाचा पार्श्वभूमीवर एक गाव एक शिवजयंती रद्द करून येथील ग्रामपंचायतीच्या वतीने छत्रपती शिवरायांची प्रतिमा पूजन व प्रतिमेस पुष्पहार सरपंच शंकर पाटील यांच्या हस्ते घालून शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
पन्हाळा तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले कोडोली हे गाव आहे. येथे दरवर्षी एक गाव एक शिवजयंती मोठया प्रमाणात साजरी करण्यात येते. शिवजयंती निमित्त कोडोलीत मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर आज कोडोली ग्रामपंचायतीच्या सभागृहात आज छत्रपती शिवाजी महारांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच शंकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. बी. टी. साळोखे, जिल्हा परिषद सदस्य विशांत महापुरे, ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील, विलास पाटील, प्रवीण जाधव, निवास पाटील, सुनील गजरे यांच्या सह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.








