वारणानगर / प्रतिनिधी
कोडोली ( ता पन्हाळा ) येथील एका २० वर्षाच्या विवाहीत महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना बुधवार दि ९ रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली असून आज गुरुवार दि. १० रोजी कोडोली पोलीस ठाण्यात याबाबत उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीतेच्या अत्याचार प्रकरणी संदेश उर्फ पुष्पक आदाम ढगे वय १९ व एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून या दोन्ही आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत कोडोली पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी अत्याचारीत महिलेने स्वःत्ता आजरोजी रात्री उशीरा फिर्याद दिली असून अत्याचारीत महिला स्वत्ताचे रडत असलेले लहान बाळास शांत करणेसाठी शेजारी रहात असलेल्या अल्पवयीन मुलाच्या घरी घेवून गेली होती. यावेळी पुष्पक ढगे हा तेथे होता. यावेळी त्यांने अत्याचारीत महिला घरात येताच दरवाजा बंद करून घेतल्यावर दोघानी सामूहिक अत्याचार केला. अत्याचारीत महिलेचा पती परगावी गेला होता तो गुरुवारी घरी आल्यानंतर त्यास ही घटना समजल्यावर त्यांनी याबाबत पोलिसात धाव घेतली. पुढील तपास सपोनि सुरज बनसोडे हे करीत आहेत.
Previous Articleपाटण प्रांत यांनी तारळे परिसरात अवैध वाळू साठ्यावर मारले छापे
Next Article धामोड येथे तीन एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक









