वारणानगर / प्रतिनिधी
लोकमान्य मल्टीपर्पज को – ऑप सोसायटीच्या कोडोली ता. पन्हाळा येथील शाखेचा पाचवा वर्धापनदिन उत्साहात संपन्न झाला असून कोडोली शाखेने आठ कोटी रु. उद्दीष्ट पूर्ण केले आहे.
लोकमान्यचे संस्थापक चेअरमन व तरूण भारतचे समूह सल्लागार संपादक यांच्या मार्गदर्शनाखाली रौप्य महोत्सव पार केलेल्या सोसायटीने कोडोलीसह परिसरात ग्राहकाभिमुख सेवा देत जनतेचा विश्वास सार्थ ठरवला आहे. संस्थेचे प्रादेशीक व्यवस्थापक दिलीप पाटील, सहा. प्रादेशीक व्यवस्थापक राजाराम पाटील यांनी कोडोली शाखेस भेट देवून शुभेच्छा देत ग्राहकांशी संवाद साधला. कोडोलीसह परिसरातील विविध संस्थेचे पदाधिकारी मान्यवर, ठेवीदार, ग्राहक यानी भेट देवून संस्थेस शुभेच्छा दिल्या.
कोडोली शाखेचे व्यवस्थापक मारूती पाटील, रविराज खिरुगडे, प्रमोद कदम, सत्यम कदम, अविनाश मोरे, संदीप साबळे यानी सर्व मान्यवरांचे स्वागत करून अभार मानले.
Previous Articleसातारा जिल्ह्यात 925 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
Next Article दिल्लीत दिवसभरात 3,428 नवे कोरोना रुग्ण









