वारणानगर / प्रतिनिधी
कोडोली ता.पन्हाळा येथील ग्रामपंचायतीने प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत सभागृहात आयोजीत केलेल्या ग्रामसभेत पेयजल योजना पूर्ण झाल्याचे तपासणी अंती सिद्ध झाल्यानंतरच योजना हस्तांतर करून घेतली जाईल तो पर्यन्त कितीही दबाव आला तरी योजना हस्तातंर केली जाणार नसल्याचे ठोस आश्वासन ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच शंकर पाटील यांनी नागरीकांना दिले.
पन्हाळा तालुक्यात कोडोली गावची ५० हजारावर सर्वाधीक मोठी लोकसंख्या आहे याचा आढावा घेत जिल्ह्यात नाविन्यपूर्ण योजना म्हणून राष्ट्रीय पेयजय योजनेतून १४ कोटी रु.च्या वर निधी मिळून या २४ x ७ योजनेत गावासाठी बारमाही चोवीस तास पाणी मिळणार आहे. या योजनेतील कामाची पूर्तता झाली म्हणून गेली सहा महिने चाचणी सुरू आहे. तथापी नळाला तोटी बसवणे, जलमापक बसवणे, अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होणे, काही ठिकाणी पाणीच जात नाही म्हणून जुन्याच योजनेतून पाणी पुसवठा अशा कामाच्या त्रुटीमुळे ग्रामपंचायतीने पेयजल योजना हस्तातंर करून घेण्यासाठी या योजनेचे नियत्रंण असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या उप अभियंता जे.डी. काटकर यानी पेयजल योजना हस्तातंर करून घ्यावी यासाठी वारंवार पत्र व्यवहार केला होता. अखेर त्यानी एकतर्फीच हस्तातंरण केल्याचे पत्र दिले या संपूर्ण प्रकारावर लक्ष वेधणारी बातमी तरूण भारतने दोनच दिवसापूर्वी प्रकाशीत केली होती. त्याचे पडसाद ग्रामसभेत उमटले होते याची दखल घेत सरपंच शंकर पाटील यानी ठोस आश्वासन दिले.









