वारणानगर / प्रतिनिधी
कोडोली ता. पन्हाळा येथील डबान नावाच्या शेतात असलेल्या जनावराच्या शेडला दुपारी अचानक आग लागली. यामध्ये तीन जनावरांचा जागीच होरपळून मृत्यू झाला असून अंदाजे पावणे चार लाखाचे नुकसान झाले आहे.
या बाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, डबान नावाच्या शेतात श्रीमती सुलोचना प्रकाश पाटील यांचे जनावराचे शेड आहे या शेड मध्ये दोन गाभण गाई व एक दुभती गाई असे एकूण तीन गाई होत्या. मंगळवार दि.१० रोजी दुपारी दोन वाजता अचानक त्या शेडला आग लागली. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केल्याने त्यात तीनही जनावरे जागीच होरपळून मृत्युमुखी पडली.
आग लागून विझत येईपर्यन्त या शेडच्या आसपास देखील कोण नव्हते त्यामुळे मदती अभावी या तीन गाईना प्राण सोडावा लागला.
लांबच्या शेतात काम करणाऱ्या नागरिकांना धुराचे लोट मोठे दिसू लागल्यावर ही बाब लक्षात आल्यावर त्यानी घटनास्थळी जावून आग विझविण्याचा प्रयत्न केला असता त्यास यश आले नाही. यात गाईंचे दोन लाख दहा हजार व शेडचे दीड लाखाचे असे तीन लाख साठ हजाराचे नुकसान झाले असल्याचा पंचनामा घटनास्थळी तलाठी अनिल पोवार,कोतवाल सिराज आंबी यांनी केला आहे.
श्रीमती सुलोचना पाटील यांची परस्थिती बेताचीच अशातच तीन गाई व शेड आगीच्या भक्षस्थानी पडून बेचिराख झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









