पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या सेल्फी पॉईंटची निर्मिती
प्रतिनिधी / वारणानगर
कोडोली ता. पन्हाळा येथील छत्रपती शिवाजी चौकातील नवीन जिर्णोद्वार केलेल्या छ.शिवाजी महाराज यांचा पुतळा व परिसर सुशोभीकरणाचे लोकार्पन जिल्हापरिषदचे माजी शिक्षण सभापती अमर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार डॉ. विनय कोरो यांचे हस्ते करण्यात आले असून नवीन ऐत्याहासीक पध्दतीच्या केलेल्या कामात पश्चिम महाराष्ट्रातील पाहिला सेल्फी पॉईंट निर्माण केला आहे.
हा चौक पन्हाळा तालुक्यातील सर्वाधिक मोठ्या लोकसंखेने असलेल्या कोडोलीत सन १९४७ साली स्वातंत्र संग्राम स्मारक म्हणून शिवाजी चौकात व्यासपीठ बांधण्यात आले होते. त्यापासून कोडोलीतील सर्व सभा समारंभ याच व्यासपीठावर होत होते. त्या व्यासपीठावरच एका बाजूला माजी आ. यशवंत ए. पाटील यानी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा सन १९९७ साली स्थापन केला होता. जुने ७३ वर्षाचे बांधकाम झाल्याने या चौकाचे सुशोभिकरण हा जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्न बनला होता.
माजी आमदार सत्यजित पाटील यांनी आमदार फंडातून १० लाख ६८ हजार रू. फंडासह ग्रामपंचायत यांच्या संयुक्त फंडातून पचांन्न लाख रू. निधी छत्रपती चौक व शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरणासाठी खर्च करण्यात आले. सुशोभीकरणासाठी काम केलेल्या इंजि. शिवाजी सुतार, काटकर व मक्तेदार संजय पाटील यांचा आ. विनय कोरे यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती व विद्यमान सदस्य विशांत महापुरे, शिवाजी मोरे शंकर पाटील,माजी सदस्य प्रा.बी.टी. सांळोखे, पंचायत समितीच्या माजी सभापती व सदस्य गीतादेवी पाटील, वारणा दूध संघाचे संचालक शिवाजी कापरे, वारणा साखर कारखाना संचालक सुरेश पाटील, वारणा बँकेचे संचालक प्रमोद कोरे,डॉ प्रशांत जमणे,जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते अॅड. राजेद्र पाटील यासह मान्यवर उपस्थित होते. सरपंच शंकर पाटील, ग्रामविकास अधिकारी ए.वाय.कदम, माजी सरपंच नितीन कापरे, माजी उपसरपंच निखिल पाटील, सर्व सदस्य व कर्मचारी यानी सर्वच मान्यवरांचे स्वागत सत्कार करून अभार मानले या सोहळ्याचे सूत्रसंचलन प्रा. जीवनकुमार शिंदे यानी केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









