वारणानगर / प्रतिनिधी
सर्वधर्मसमभावाचे प्रतिक बनलेल्या व कोडोली परिसराच्या सर्वांगीण पायाभूत सुविधांच्या माध्यमातून विकासास प्रेरणा देणाऱ्या कोडोली तालुका पन्हाळा येथील चर्चच्या इमारतीला शंभर वर्ष पूर्ण झाली असून या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने शुक्रवार दि. १७ व शनिवार दि. १८ रोजी सलग दोन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन कोडोली ख्रिश्चन प्रेस्बिटेरियन चर्चच्या वतीने आयोजन केले आहे.
शुक्रवार दि.१७ रोजी सकाळी १० वा.पंढरा बंगला ते चर्चपर्यन्त सर्व आचार्य व सभासद यांची प्रभात फेरी, ११ वा. संजीवन सभा रेव्ह.बी.आर. तिवडे (बिशप),के.सी.सी. चे मॉडरेटर रेव्ह.आर.आर. मोहिते, के.सी.सी.चे सेक्रेटरी रेव्ह.जे.ए. हिरवे, रेव्ह. श्रीनिवास चोपडे यांच्या उपस्थितीत उद्घाटक व मार्गदर्शक नागपूरचे धर्मप्रांत रेव्ह.बिशप शरद गायकवाड, मुंबई येथील डॉ. ज्ञानेश्वर सोहळकर मंडळी ते मंदीर या विषयावर प्रवचन देणार आहेत.
शनिवार दि. १८ रोजी सकाळी ११ वा. चर्चच्या आजवरच्या शताब्दी वर्षातील आढावा घेणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन व मान्यवरांचा सन्मान छत्रपती शाहू महाराज, राज्याचे ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते व आमदार विनय कोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
शताब्दी महोत्सवानिमित्त चर्चवर आकर्षक रंगीबेरंगी विद्युत रोषणाई केली आहे. उपस्थितांसाठी बैठक व्यवस्था आणि भव्य मंडप विविध कार्यक्रमासाठी उभा करण्यात आला आहे. कोडोली ख्रिश्चन प्रेस्बिटेरियन चर्चचे अध्यक्ष रेव्ह.एस.एस.विभूते, उपाध्यक्ष रेव्ह.एस.आर.रणभिसे, विश्वस्त रेव्ह.आशितोष आवळे, शमुवेल गायकवाड, शामराव आ. बुचडे, मधुकर चोपडे, वारणा बॅंकेचे संचालक डॉ. प्रशांत जमने, डॅनियल काळे यासह सर्वजन शताब्दी महोत्सव यशस्वी करण्यास प्रयत्न करीत असल्याचे कोडोली ख्रिश्चन प्रेस्बिटेरियन चर्चचे आर.एन. सुर्यवंशी यानी पत्रकार परिषदेत सांगितले.