वारणानगर / प्रतिनिधी
गोव्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील ख्रिश्चन समाजाचे मोठे तीर्थक्षेत्र असलेल्या कोडोली ता. पन्हाळा येथील शतकात्तर परपंरा असलेला नाताळ उत्सव यावेळी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याची माहिती ख्रिश्चन प्रेसबिटेरियन चर्च कोडोलीचे अध्यक्ष रेव्हरंड एस.आर.रणभिसे यानी पत्रकार परिषदेत दिली.
कोडोलीत गेली शंभरवर्ष चालू असलेला ख्रिस्त जन्मोत्सव कोरोनाच्या महामारी मुळे चालू वर्षी साजरा न करण्याचा निर्णय ख्रिश्चन प्रेसबिटेरियन चर्च कोडोली, के.डी.सी व के.सी.सी सेशन वर्ग यांचा संयुक्त बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष एस.आर.रणभिसे यांनी सांगितले.
कोडोलीतील नाताळ सण परिसरातील सर्व धर्मातील नागरिक गेली शंभर वर्षे एकत्रित उत्सव साजरा करत होते. यामुळे कोडोलीला जत्रेचे स्वरूप येत होते. परंतु कोरोनाच्या महामारीमुळे चालू वर्षी नाताळ साजरा न करता शासन नियमाच्या अटी व शर्तीचे पालन करून या उत्सव काळात होणारे कॅडल लाईट, लौकिक उपासना, प्रभू भोजन, वस्तूंचा लिलाव हे कार्यक्रम ज्यात्यावेळी मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत होणार असून, नाताळ दिवशी भक्तीत खंड पडू नये यासाठी उपासना घेण्यात येणार आहे.
लोकांनी गर्दी करू नये व व्यापाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे स्टॉल, खेळण्याची दुकाने लावू नये व सर्वांनी कोरोना संक्रमण टाळण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेचे रेव्हरंड रणभिसे यानी सांगीतले. यावेळी रेव्हरंड आशितोस आवळे,सेक्रेटरी शमुवेल गायकवाड,रविंद्र तळसंदेकर, प्रवीण महापुरे, नितीन चोपडे, अनिल महापुरे, डॅनियल गायकवाड, दत्ता महापुरे, अब्राहम काळे, डॅनियल माने उपस्थित होते.









