कोडगु/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. सरकार खबरदारीच्या उपाययोजना राबवत आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर केंद्र सरकारने काही उद्योग व व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली आहे.त्यानुसार नियमांचे पालन करत काही उद्योग आणि व्यवसाय सुरु आहेत. पण नागरिकांमध्ये अजून कोरोनाविषयी भीती असल्याचे दिसून येत आहे.
कर्नाटकातील कोडगु जिल्ह्यातील सोमवरपेट तालुक्यातील ग्रामस्थांनी खासगी रिसोर्ट बंद करण्यासाठी तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. रिसॉर्ट बंद न झाल्यास गावकऱ्यांनी निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे. तसेच या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना प्रवेश देणार नाही असा पवित्र घेतला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार केरळ आणि तामिळनाडूसारख्या राज्यांतील लोक रिसॉर्टमध्ये राहतात. त्यामुळे कोरोना संसर्ग होण्याचा धोका आहे. रिसॉर्टमध्ये बर्याच स्थानिक लोक नोकरीस आहेत. रिसॉर्ट मॅनेजरच्या म्हणण्यानुसार हे आरोप निराधार आहेत. इतर राज्यातून कोणतेही पर्यटक येत नाहीत. शासन व आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करत आहे. केरळ आणि तामिळनाडू नोंदणीकृत वाहने बेंगळुरू आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमधून येत आहेत.
दरम्यान, कोडुगु हॉटेल अँड रिसॉर्ट असोसिएशनने स्वतः रिसॉर्ट्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष नागेंद्र प्रसाद म्हणाले की, जिल्ह्यात सहा कॉर्पोरेट रिसॉर्ट्स खुले आहेत जे बंद होणार नाहीत. रिसॉर्ट्स चालकांनी म्हंटले आहे की कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून ते सर्व सरकारी आदेशांचे पालन करीत आहेत. त्यामुळे रिसॉर्ट्स बंद करण्याचं प्रश्न उद्भवत नाही.