प्रतिनिधी / सातारा
जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे.या कायद्याचा भंग करून कोटेश्वर मैदानावर सायंकाळी 5 वाजता चालण्यासाठी आलेल्या 16 जणावर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी दिली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत होते. सहायक फौजदार नारायण मोहिते, हवालदार कदम हे त्यामध्ये होते.त्यांना कोटेश्वर मैदानावर एव्हीनिंग वॉक 5 वाजता काही लोक दिसले.त्यांनी विचारणा केली असता चालण्यासाठी आल्याचे सांगितले. यावरून रवींद्र हणमंत बारटक्के(वय 60, रा.98/1शुक्रवार पेठ सातारा),सदाशिव पतंगराव शिंदे(वय66, रा.66 प्रतापगंज पेठ,सातारा), राजेश दत्तात्रय कापसे(वय49, रा.शुक्रवार पेठ), श्रीरंग मारुती शिंदे(वय71, रा.49 शुक्रवार पेठ), संभाजी नारायण जाधव(वय 45, रा.130 प्रतापगंज पेठ),उमेश मदनलाल लकेरी(वय52, रा.118 प्रतापगंज पेठ), शेखर जगन्नाथ कोल्हापूरे(वय55, रा.30प्रतापगंज पेठ), देवेंद्र पांडुरंग झुटिंग(वय64, रा.185 भवानी पेठ), मनोहर रघुनाथ जाधव (वय 55, रा.123 प्रतापगंज पेठ), दीपक पोपट दीक्षित(वय 60, रा.14 कोटेश्वर मैदान ), अस्लम करिम बागवान(वय 55, रा.244 प्रतापगंज पेठ), आबा दादासाहेब पालकर(वय 61, रा.116 सदाशिव पेठ), मनीषा नितीन लकेरी(वय 40, रा.120 प्रतापगंज पेठ), वैशाली राजेश परदेशी (वय 40 रा.164 प्रतापगंज पेठ), निर्मला विश्वास पटेकर(वय 55, शुक्रवार पेठ), विजया रवींद्र बारटक्के (वय 57, रा.शुक्रवार पेठ) यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला.भा.द.वि. स.269, 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Previous Articleकोल्हापूर जिल्हय़ात 700 जण इन्स्टिटय़ूशनल क्वारंटाईन
Next Article कराडात मुदतबाह्य हॅण्डवॉशचा मोठा साठा जप्त









