वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) उदय कोटक यांना पुन्हा एकदा कोटक महिंद्रा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) या पदावर नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे उदय कोटक आगामी तीन वर्षांपर्यंत बँकेची धुरा सांभाळणार असल्याची माहिती आहे. मागील जवळपास 17 वर्षांपासून कोटक बँकेच्या एमडी आणि सीईओ पदांची सूत्रे कोटक यांच्या हाती राहिली आहेत.
आरबीआयने बँकांच्या सीईओच्या कार्यकाळाची मर्यादा 10 वर्षांपर्यंत निश्चित करण्याचा प्रस्ताव सहमत केला होता. यानंतर अनेक ब्रोकरेज हाऊसने याला मान्यता दिली होती. यावरुन कोटक महिंद्रा बँकेच्या नेतृत्वात बदल होण्याचे संकेत मिळत होते. परंतु तसे काही झाले नाही.









