कोझुकट्टाई हा केरळीयन गोड खाद्यपदार्थ आहे. हा तयार करण्यासाठी
साहित्यः
वाटीभर तांदळाचं
पीठ,
दीड वाटी खोवलेला नारळ, अर्धी वाटी गुळाचा पाक,
1 चमचा वेलचीपूड, 1 चमचा तूप,
1
वाटी पाणी, चवीपुरते चिमूटभर मीठ
कृतीः
पाण्यात तूप व मीठ घालून उकळून घ्या. हे उकळते पाणी तांदळाच्या पिठात घालून मऊसर मळून घ्या. यामध्ये गुठळी राहणार नाही, याची दक्षता घ्या. या पिठाचे लिंबाच्या आकाराएवढे गोळे बनवून घ्या. जाड बुडाचा पॅन गरम करून त्यात तेल किंवा तूप घालून त्यावर खोबरे व वेलचीपूड घालून काही वेळ परतून घ्या. हे खोबरे नंतर गुळाच्या पाकात ओतून ढवळा. यातील पाण्याचा अंश जाईपर्यंत मंद आचेवर परतून घ्या. आच बंद करून हे सारण दुसऱया पातेल्यात ओतून घ्या. हातावर थोडे तेल ओतून पसरून घ्या. पिठाचा गोळा हातावर पसरून थोडा मोठा करा. यामध्ये सारण भरून हा गोळा बंद करा.हे गोळे मोदकाप्रमाणे उकडून घ्या. गरमागरम कोझुकट्टाईवर तूप घाला व खाण्यास द्या.
टीपः सर्व गोळे बनविताना पिठावर ओलसर कपडा पसरून ठेवा. म्हणजे पीठ घट्ट होणार नाही.









