सांगरुळ/प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व कर्मचारी सह.पतपेढी मर्या.कोल्हापूर या संस्थेच्या नुतन चेअरमन पदी प्रकाश गोपाळ वरेकर (उदयसिंह पाटील विद्यालय असळज) तसेच व्हाईस चेअरमन पदी अरुण वसंत कांबळे (ईश्वरराव वाडकर विद्यालय दिंडनेर्ली )यांची बिनविरोध निवड झाली .संस्थेचे चेअरमन किरण पास्ते यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते .नवीन चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील श्रेणी-1 अधिकारी व्ही एन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
निवडी पूर्वी सुखाणू कमिटी सदस्य सांगरूळ शिक्षण संस्थेचे सचिव प्रा जयंत आसगावकर, संस्थाचालक संघाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, मुध्यापक संघाचे माजी चेअरमन व्हि.जी .पोवार, के के पाटील ,उदय पाटील, बापूसाहेब शिंदे ,नाना गोखले, आर एस मर्दाने यांची संचालक मंडळा समवेत एकत्र बैठक होऊन संचालकाची मते आजमावून घेतली .यानंतर बंद लिफाफ्यामधून चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची नावे संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये पाठविण्यात आलीत .यानुसार चेअरमनपदी प्रकाश वरेकर तर व्हा चेअरमन पदी अरुण कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
बिनविरोध निवडीबद्दल नूतन चेअरमन प्रकाश वेरेकर व व्हाईस चेअरमन अरुण कांबळे यांनी सुकानु कमिटी सदस्यांचे व सर्व संचालकांचे आभार मानले व पतपेढीच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.









