आरपीसीआर रिपोर्ट बंधनकारक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस-आरोग्य प्रशासन सतर्क
वार्ताहर / कोगनोळी
नजीकच्या महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील कोगनोळी फाटय़ावर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. गेल्या चार दिवसांपासून दिलेली किरकोळ सवलतही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांची अडचण झाली आहे.
नाक्मयावर आल्यावर चारचाकी वाहनातील चालकांसह प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करूनच कर्नाटकात प्रवेश देण्यात येत आहे. आरटीपीसीआर रिपोर्ट नसणाऱया शेकडो वाहनधारकांना परत महाराष्ट्रात पाठविण्यात येत आहे. त्यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांची गोची झाली आहे.
प्रवाशांची अडचण
महाराष्ट्रातून कर्नाटकमार्गे पुन्हा महाराष्ट्रात जाणाऱया प्रवाशांना या ठिकाणी मोठी अडचण निर्माण होत आहे. लगतच असणाऱया महाराष्ट्रात रोजंदारी व नोकरीसाठी जाणाऱया लोकांना कोरोना रिपोर्ट दाखवून कर्नाटकात प्रवेश घ्यावा लागत आहे. महाराष्ट्रात वाढत असणाऱया कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता कर्नाटकात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. कोगनोळी फाटय़ावरील सीमा तपास नाक्मयावर पोलीस प्रशासन, आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत प्रशासन यासह अन्य विभागांचेही अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.









