नवी दिल्ली
आर्थिक वर्ष 2020-21 मधील बराचसा कालावधी हा कोरोनाच्या महामारीमुळे प्रभावीत राहिला होता. परंतु याच दरम्यान कोका-कोला इंडियाचा निव्वळ नफा हा वर्षाच्या आधारे 28.4 टक्क्यांनी घटून 443.38 कोटी रुपयावर पोहोचला आहे. तसेच महसूलही 16.2 टक्क्यांनी घटून 2,297.51 कोटी रुपयावर आला आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2020मध्ये 619.14 कोटी रुपयाचा नफा कमविला होता. कोका-कोला कंपनीचे एकूण उत्पन्न मार्च 2021 रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षात 16.2 टक्क्यांनी घटून 2,355.10 कोटी रुपयाच्या घरात पोहोचले आहे.









