ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोल्डड्रिंक बनवणारी कंपनी ‘कोकाकोला’ जगभरातील 2,220 कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. यामध्ये अमेरिकेतील 1200 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कोकाकोलाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना काळात कोकाकोलाच्या उत्पादनांच्या विक्रीत घट झाली होती. कोरोनानंतरच्या काळात 2021 मध्ये मार्केटची उत्तम तयारी करण्यासाठी रिस्ट्रक्चरिंग प्लॅन अंतर्गत 2,200 नोकऱ्यांमध्ये कपात करण्यात येणार आहे.
वर्षाच्या सुरवातीला कंपनीमध्ये जवळपास 86,200 कर्मचारी होते. त्यामध्ये अमेरिकेचे 10,400 कर्मचारी समाविष्ट होते. कंपनीच्या ग्लोबल वर्कफोर्सच्या 2.6 टक्के कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होणार आहे.









