प्रतिनिधी/ खेड
कोकण रेल्वे मार्गावरील कडवई रेल्वेस्थानक कार्यान्वित करण्याच्या पूर्वतयारीसाठी 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 ते रात्री 9.30 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
आरवली ते संगमेश्वर रोडदरम्यान काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे कोकण मार्गावर मुंबईहून मडगावला जाणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस खेड ते चिपळूण रेल्वेस्थानकादरम्यान 60 मिनिटे थांबवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.









