प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोकण रेल्वे महामंडळामध्ये 58 तांत्रिक पदांची भरतीसाठी निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आह़े 28 ऑक्टोबरपासून भरती प्रक्रियेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आह़े तर 27 नोव्हेंबरला अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आह़े
या पदांसाठी 10 वी/ एसएसएलसी अधिक आयटीआय कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एनसीव्हीटी/एससीव्हीटी ट्रेड इलेक्ट्रीशयन/वायरमन/ मॅकेनिक आदी पात्रता राहणार आहेत़ या पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 33 इतकी असणार आह़े इतर प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये तर अनुसूचित जाती, जमाती, महीला, अल्पसंख्यांक, आर्थिक मागासवर्गियांना 250 इतके अर्जाचे शुल्क असणार आह़े अधिक माहितीसाठी कोकण रेल्वेच्या संकेतस्थळाशी पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









