प्रतिनिधी / मडगाव
रेल्वेचे अपघात टाळण्यासाठी आज चांगल्या पद्धतीने काम करत आहे. कोंकण रेल्वे स्वयंचलित रेल्वे परीक्षा प्रणाली (ऐटीएस) सुविधाच्या माध्यमाने कोणतीही जिवीत हानी होण्यापासून टाळण्याचे काम केले जाईल. या सुविधेच्या माध्यमाने रेल्वेची संपूर्ण देखरेख केली जात असल्याची माहिती दीपक त्रिपाठी यांनी दिली.
कोंकण रेल्वे स्वयंचलित रेल्वे परीक्षा प्रणालीची माहिती देताना ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल इंडियाला जास्त महत्व देत असून यात कामगारांना ताणावाखाली काम न करता स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मिळते. जे काम दहा कामगार करत होते ते काम आता पाच कामगार सुद्धा करु शकतात. रेल्वे ट्रकच्या बाजूलाही कॅमेरे बसवण्यात आलेले आहे. यातून संपूर्ण माहिती कंट्रोल रुममध्ये बसून मिळवली जाते. तसेच कोणताही वाईट प्रसंग घडण्याची शक्यता असल्यास ट्रकच्या बाजूला बसवलेल्या कॅमरा व सेन्सरच्या माध्यमाने माहिती मिळवता येते. चोवीस तास तापमानाचे सेन्सर व कॅमरा चालूच ठेवलेले असतात.
लोकांच्या व कोंकण रेल्वेच्या कर्मचाऱयांच्या जीवाची काळजी घेऊन कोंकण रेल्वेने हे बदल घडवून आणले असल्याची माहिती दीपक त्रिपाठी यांनी यावेळी बोलताना दिली. यावेळी त्यांच्या सोबत कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे उपस्थित होते.









