१ एप्रिल ते ९ जूनपर्यंत नियमितपणे धावणार, प्रवाशांना दिलासा
प्रतिनिधी / खेड
कोकण मार्गावरून धावणाऱ्या मुंबई सीएसएमटी – मडगाव फेस्टीवल स्पेशल रेल्वेगाडीला प्रवाशांच्या मिळत असलेल्या उदंड प्रतिसादानंतर या गाडीच्या दोन फेऱ्या १ एप्रिल ते ९ जूनपर्यंत धावणार आहेत. नियमितपणे धावणारी ही गाडी पूर्णपणे आरक्षित राहणार आहे. शिमगोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासात या फेऱ्यांचा लाभ होणार असल्याने प्रवाशी सुखावले आहेत.
०११११/०१११२ क्रमांकाची मुंबई सीएसएमटी – मडगाव फेस्टीवल स्पेशल १ एप्रिल ते ९ जून या कालावधीत धावणार आहे. मुंबई येथून रात्री ११.०५ वाजता ही गाडी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४५ वाजता मडगावला पोहचेल. परतीच्या प्रवासात सायंकाळी ६ वाजता मडगाव येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ५.५० वाजता मुंबईला पोहचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, पेडणे, थिविम, करमाळी आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
०१११३/०१११४ क्रमांकाची मुंबई सीएसएमटी मडगाव फेस्टीवल स्पेशल २ एप्रिल ९ जूनदरम्यान नियमितपणे धावणार आहेत. मुंबई येथून सकाळी ७.१० वाजता ही गाडी सुटेल.त्याच दिवशी सायं.७ वाजता मडगावला पोहचेल.परतीच्या प्रवासात मडगाव येथून सकाळी ९.१५ वाजता सुटून त्याचदिवशी रात्री ९ .४० वाजता मुंबईला पोहचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, पेडणे, थिविम, करमाळी आदी स्थानकांवर थांबेल.