प्रतिनिधी / खेड
कोकण मार्गावर १ नोव्हेंबरपासून १५ जानेवारीपर्यंत मांडवी एक्स्प्रेसप्रमाणे धावणारी मडगाव – मुंबई ( सीएसएमटी ) फेस्टीवल स्पेशल नियमितपणे चालवण्यात येणार आहे. या फेस्टीवल स्पेशलला खेड व माणगावसाठी आरक्षण कोटा वाढवून द्यावा, अशा मागणीचे निवेदन कोकण रेल्वे समन्वयक समितीचे कार्यवाहक अक्षय म्हाब्दी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोकण मार्गावर चालवण्यात येणाऱ्या मडगाव – मुंबई फेस्टीवल स्पेशलची वेळ प्रवाशासाठी सोयीची असल्याने माणगावपासून रत्नागिरीपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा चांगला फायदा होणार आहे. मात्र, कोकण रेल्वेने या गाडीला मुंबईकडे येताना रत्नागिरीपासून एकूण क्षमतेच्या केवळ १० टक्के जागांचा आरक्षण कोटा दिलेला आहे. रत्नागिरी, खेड ते माणगावमधील ५ रेल्वेस्थानकांना केवळ १० टक्के जागा दिलेली असताना इतर ११ स्थानकांना ( मडगाव ते आडवली ) ८० टक्के जागा मिळणार आहेत.
कमी उपलब्धततेमुळे या ५ स्थानकांना प्रतिक्षा यादीतील आरक्षण दिसणार असून इतर ठिकाणी ते सहज उपलब्ध असणार आहे. तसेच अनारक्षित प्रवासाची परवानगी नसल्याने प्रामुख्याने खेड व माणगाव विभागातील प्रवाशी या गाडीचा लाभ घेवू शकणार नाहीत. यापार्श्वभूमीवर सर्वच स्थानकांना समान संधी मिळणे आवश्यक आहे. रेल्वे प्रशासन ही गाडी विशेष प्रवास भाड्यावर चालवणार आहे. यामुळे थ्रीए व एसएल शयनयान वर्गाचे प्रवासभाडे दुपट्टीपेक्षाही जास्त वाढणार आहे.
कोकण रेल्वे वरील प्रवासासाठी आधीच ४० टक्के अधिभार देत असताना व सध्या सर्व नियमित गाड्या सुरू असताना हे वाढीव भाडे अन्यायकारकच आहे. यासाठी ही गाडी विशेष भाड्यावर न चालवता सामान्य दरावर चालवण्यात यावी, असेही निवेदनात नमूद केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









