प्रतिनिधी/ खेड
कोरोनाच्या संकटामुळे बंद करण्यात आलेल्या रेल्वेगाडय़ांच्या सेवा पूर्ववत करण्याचा सपाटा रेल्वे प्रशासनाकडून सुरूच असल्याने प्रवाशी सुखावले आहेत. कोकण मार्गावर धावणाऱया आणखी 4 सुपरफास्ट साप्ताहिक स्पेशल पुन्हा कोकण मार्गावर धावणार आहेत. पुणे-एर्नाकुलम साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल गाडीसह लोकमान्य टिळक टर्मिनस-कोच्युवेली साप्ताहिक सुपरफास्ट व लोकमान्य टिळक-मडगाव सुपरफास्ट साप्ताहिक स्पेशल गाडीच्या 2 फेऱयांचा समावेश आहे.
मध्य व दक्षिण रेल्वेच्या सहकार्याने चालवण्यात येणाऱया या स्पेशल गाडय़ा पूर्णपणे आरक्षित आहेत. 11 जुलैपासून पुढील सल्ल्यापर्यंत पुणे-एर्नाकुलम साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल धावणार आहे. दर रविवारी पुणे येथून सायंकाळी 6.45 वाजता सुटणारी ही गाडी एर्नाकुलमला दुसऱया दिवशी रात्री 9.55 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात 13 जुलैपासून दर मंगळवारी 2.15 वाजता एर्नाकुलम येथून सुटून दुसऱया दिवशी पहाटे 5.50 वाजता पुणे येथे पोहोचेल. या स्पेशल गाडीचा पुणेस्थित चाकरमान्यांना चांगला फायदा होणार आहे.
01085/01086 क्रमांकाची लोकमान्य टिळक-मडगाव साप्ताहिक एक्सप्रेस 2 ऑगस्टपासून पुढील सल्ल्यापर्यंत धावेल. दर सोमवारी व बुधवारी धावणारी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून पहाटे 5.33 वाजता सुटून त्याच दिवशी सायंकाळी 7 वा. मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात 3 ऑगस्टपासून दर मंगळवारी व गुरूवारी ही गाडी धावेल. मडगाव येथून पहाटे 5 वाजता सुटून त्याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
01099/01100 क्रमांकाची लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव साप्ताहिक एक्सप्रेस 7 ऑगस्टपासून पुढील सल्ल्यापर्यंत धावेल. दर शनिवारी रात्री 12.45 वा. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटून दुसऱया दिवशी दुपारी 1.25 वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात 8 ऑगस्टपासून दर रविवारी सकाळी 12.15 वाजता मडगाव येथून सुटून त्याच दिवशी रात्री 11.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस-कोच्युवेली साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल गाडी 3 ऑगस्टपासून पुढील सल्ल्यापर्यंत धावणार आहे. दर मंगळवारी व शनिवारी धावणारी ही गाडी सायंकाळी 4.55 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटून दुसऱया दिवशी रात्री 11 वाजता कोच्युवेलीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात 5 ऑगस्टपासून दर सोमवारी व गुरूवारी कोच्युवेली येथून रात्री 12 वाजून 35 मिनिटांनी सुटून दुसऱया दिवशी सकाळी 8 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.









