अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड उद्घाटक गोव्याचे लोकायुक्त अंबादास जोशी
प्रतिनिधी /पणजी
ज्या साहित्य संमेलनाची गोवा आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकातील साहित्यकि पंढरीच्या वारीप्रमाणे दरवषी कधी होणार याची साहित्यकि वाट पाहतात ते कोकण मराठी परिषदेचे सतरावे शेकोटी साहित्य संमेलन येत्या 8 आणि 9 जानेवारी 2022 रोजी केरी (फोंडा) येथील श्री विजयादुर्गा देवालयाच्या प्रांगणात होणार आहे. यंदाच्या शेकोटी संमेलनाच्या अध्यक्षपदी बडोदे येथे 2018मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, कादंबरीकार व निवृत्त सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी अक्षरप्रति÷ा या दिवाळी अंकाचे तसेच अयान या दिवाळी अंकांचे संपादक म्हणून काम केले आहे. आळंदीच्या श्रीज्ञानेश्वर माऊली संस्थानचे विश्वस्त म्हणून त्यांनी संत ज्ञानेश्वरांचे आणि इतर संतांचे साहित्य तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी पसायदान साहित्य संमेलन त्यांनी सुरू केले.
संमेलनाचे उद्घाटन गोव्याचे लोकायुक्त अंबादास जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अंबादास जोशी यांनी बीडमध्ये वकिली सुरू केली. 1982 पासून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वकिली केली. त्याच न्यायालयात त्यांनी 1987 ा 88 मध्ये सरकारी वकील म्हणून काम केले. अनेक सरकारी पदे त्यांनी भूषविली आहेत. उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठाचे ते न्यायाधीश होते. महाराष्ट्र शासनाने 2014 मध्ये महाराष्ट्र प्रशासकीय लवादाचे ते अध्यक्ष होते.
संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अनेक कादंबऱया गाजल्या आहेत. ग्रामीण भागातील समस्या त्यांनी या कादंबऱयांच्या माध्यमातून मांडल्या आहेत. मराठीबरोबरच ’हिंदी’ शायर कैफी आझमी यांच्या साहित्याचा त्यांचा अभ्यास आहे. ते उत्तम वक्ते असून त्यांची व्याख्याने गोवा आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेली आहेत. ’होते कुरूप वेडे’, ’अंधेरनगरी’, ’ऑक्टोपस’, ’इन्कलाब विरुद्ध जिहाद’, या कादंबऱया तसेच ’कथांजली’, ’सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी’, ’नंबर वन’, ’मृगतृष्णा’, ’गाव विकणे आहे’, ’माणूस नावाचं एकाकी बेट’ आदी कथासंग्रह वाचकप्रिय आहेत.
संमेलनाचे उद्धाटक अंबादास जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते गोव्याचे लोकायुक्त म्हणून काम पाहत आहेत. लोकसाहित्याचे गाढे अभ्यास विनायक खेडेकर यांची खास मुलाखत हे या संमेलनाचे वैशिष्टय़ आहे.
संमेलनात परिसंवाद, अध्यक्षांनी दिलेल्या विषयावर उपस्थित विशेषतः युवा कवी- कवयित्री?नी तत्काळ रचलेल्या कवितांचे सादरीकरण असलेले चाफा कविसंमेलन, मनोरंजनपर कार्यक्रम, पुस्तकांवर चर्चा (वाचन संस्कृतीचे जतन व संवर्धन) तसेच निमंत्रितांचे कविसंमेलन, पाच साहित्यकांचा सन्मान आदी कार्यक्रम होणार आहेत. यंदाच्या संमेलनात मान्यवर आणि नामवंतांची मांदियाळी असणार आहे. या संमेलनाविषयी अधिक माहितीसाठी तसेच संमेलनात कोणाला आपले पुस्तक प्रकाशित करायचे असेल तर कोमपच्या सचिव चित्रा क्षीरसागर यांच्याशी 9850832291 या क्रमांकावर आणि कोकण मराठी परिषदेच्या कार्यकारिणीचे सदस्य मंगेश काळे यांच्याशी 9011036446 संपर्क साधावा.









