10 वीचा 34.05 टक्के तर 12 वीचा 14.42 टक्के निकाल : परीक्षेला बसलेल्या एकूण 767 विद्यार्थ्यांपैकी 189 जण उत्तीर्ण
प्रतिनिधी / रत्नागिरी
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षा -2020 कोकण बोर्डाचा एसएससी परीक्षेचा निकाल 34.05 टक्के इतका लागला आहे. या परिक्षेला बसलेल्या 326 पैकी 111 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच एचएससी परीक्षेचा निकाल 14. 42 टक्के इतकला लागला असून या परीक्षेत बसलेल्या 541 पैकी केवळ 78 विद्यार्थीच उत्तीर्ण झाले आहेत.
एसएससी परीक्षेचा राज्याचा निकाल 32.60 टक्के इतका लागला. त्यात कोकण बोर्डामार्फत घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेसाठी रत्नागिरी व सिंधुदूर्ग या दोन्ही जिल्हय़ातून एकूण 326 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यातील 250 मुले व 76 मुलींचा समावेश होता. परिक्षेच्या निकालात यातील 88 मुले तर 23 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 35.20 टक्के त मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 30.26 टक्के इतके आहे.
एचएससी परीक्षेचा राज्याचा एकूण निकाल 18.41 टक्के इतका लागला आहे. त्यामध्ये कोकण बोर्डाचा निकाल 14.42 टक्के लागला. कोकण बोर्डात एकूण 541 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील केवळ 78 विद्यार्थीच उत्तीर्ण झाले आहेत. या निकालात विज्ञान शाखेत 107 पैकी 17 विद्यार्थीच उत्तीर्ण होऊन या शाखेचा निकाल 15.89 टक्के इतका लागला आहे. कला शाखेतून बसलेल्या 271 विद्यार्थ्यांपैकी फक्त 28 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 10.33 टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून बसलेल्या 112 विद्यार्थ्यांपैकी 31 विद्यार्थीच उत्तीर्ण होऊन 27.68 टक्केच निकाल लागला आहे. तर व्यवसायिक अभ्यासक्रमातील 51 विद्यार्थ्यांपैकी केवळ 2 विद्यार्थीच उत्तीर्ण होऊन हा निकाल 3.92 टक्के इतका लागला आहे.
राज्यातील परीक्षा निकालाची टक्केवारीः
बोर्ड 10 वी 12 वी
पुणे 30.76 14.94
नागपूर 29.52 18.63
औरंगाबाद 39.11 27.63
मुंबई 29.88 16.42
कोल्हापूर 30.17 14.80
अमरावती 32.53 16.26
नाशिक 37.42 23.63
लातूर 33.59 22.05 कोकण 34.05 14.41









