दीपक करंजीकर यांचे आवाहन
पर्वरी (प्रतिनिधी)
प्रत्येक भाषा प्रदेशाचा स्वभाव घेऊन अवतरत असते.कोंकणी भाषेचे वैशिष्टय़ आपण जपले पाहिजे.बा.भ बोरकर सारखे कवी इतकी उत्तुंग काव्य निर्मिती करू शकले कारण त्यांची नाळ कोंकणी भाषेकडे जोडलेली होती.विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे आजचे जग आमुलाग्र बदललेले आहे,पण विज्ञान हे नितीनिरपेक्ष असते.तंत्रज्ञान वापरणारा हात नितीमान असेल तरच त्या तंत्रज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी होईल.साहित्य समाजाला सत्य,शिव व सुंदराची ओळख करून देत असतं, आपल्या भोवतालचा परिसर सुंदर बनवणे हेच कुठल्याही सच्च्या कलावंताचे ध्येय असते.” असे प्रेरणादायी विचार संमेलनाचे प्रमुख अतिथी या नात्याने श्री.दीपक करंजीकर यांनी मांडले
येथिल विद्या प्रबोधिनी महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय 21 वे युवा कोंकणी साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळय़ाच्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नमन सावंत धावस्कर,गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष श्री.अरूण साखरदांडे,प्रबोधन एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष श्री. संजय वालावलकर,स्वागताध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रा.श्री भुषण भावे,कार्याध्यक्ष प्रा.श्री.दर्शन कांदोळकर तसेच प्रा.दर्शना मांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्राची सुरूवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली.”विद्या प्रबोधिनी महाविद्यालय आणि गोवा कोंकणी अकादमी यांच्या संयुक्त माने पार पडणाऱया या साहित्य संमेलनाचे औचित्य कोंकणी भाषेविषयी ओढ असणाऱया रसिकजनांपर्यंत तिच्या साहित्याची महती पोहचावी हेच आहे आणि समोर रसिकांनी भरलेलं प्रांगण आमचा हा उद्देश सफल झाल्याचे सांगते,आपण सर्व या सोहळय़ाला आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार आणि या अभुतपूर्व सोहळय़ाला सर्वांचे मनापासून स्वागत..” असे मनोगत प्रास्ताविकाच्या वेळी स्वागताध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्री भुषण भावे यांनी व्यक्त केले.
आधुनिक साधनांमध्ये गुरफटलेली पिढी म्हणून जिची ओळख आहे ती आज माझ्या समोर इतक्मया मोठय़ा संख्येने आणि गोवाच नव्हे तर कर्नाटक आणि केरळ या राज्यातून येथे उपस्थित आहे हे पाहून मनाला आंतरिक समाधान वाटते आहे.आजच्या या सोहळय़ाला अनेक नामवंत,अनुभव कवी,कवयित्री,लेखक,लेखिका उपस्थित असणार आहेत विविध सत्रांमधून ते आपले विचार मांडतील.तुम्ही सर्वांनी त्या अनुभवाची शिदोरी जपा आणि हा समृद्ध वारसा पुढे चालवा..”अशी प्रेरणा श्री.अरूण साखरदांडे आपल्या भाषणातून उपस्थितांना दिली.यानंतर प्रबोधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.संजय वालावलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
नवोदित लेखक श्री.गौरख सिरसाट यांच्या पुस्तकाचे यावेळी प्रबोधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री.संजय वालावलकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले.”अभिव्यक्तीचे माध्यम कोणतेही असू शकते.उत्कटतेने सामाजिक सत्य दाखवणारे कलात्मक सत्य मला नेहमीच कलेकडे आणि पर्यायाने समाजाकडे मला आकर्षित करते आणि हिच माझ्या लेखनाची प्रेरणा आहे..”अशा शब्दात नवोदीत लेखक श्री.गोरक शिरसाट यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.तसेच या पुस्तकाविषयी गोवा विद्यापीठाचे कोंकणी विभाग प्रमुख डा?.हनुमंत चोपडेकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.त्याचप्रमाणे युवांकुर आणि स्मरणिकेचे प्रकाशन माननीय श्री.दीपक करंजीकर आणि अरूण साखरदांडे यांच्या हस्ते झाले.”
.यानंतर “विद्येविना विद्येविना मती गेली, मतीविना निती गेली,नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले,वित्ताविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले हे श्री.ज्योतिबा फुले आणि सौ.सावित्रीबाई फुले यांनी मांडलेले मत आहे,आज त्यांच्या प्रयत्नामुळे आपण शिक्षण घेऊ शकतोय.मुळात साहित्य म्हणजे काय तर व्यक्त होण्याचे साधन,आपल्या भावनांना वाट करून देण्याचे माध्यम.आपले विचार नि आपली मतं हे जनमानसापर्यंत आपल्या साहित्याच्या माध्यमातून पोहचतात.आपल्या देशात अनेक क्रांती घडल्या आणि त्या घडवून आणण्यात साहित्याचं मोलाचं योगदान आहे.आपलेच कितीतरी गोमंतकीय लेखक मनोहरराय सरदेसाय,बा.द सातोस्कर इत्यादींच्या शब्दांनी आपल्या मनात क्रांतीची भावना रूजवली.आज शस्त्रधारी क्रांती जरी गरज नसली तरी साहित्य निर्मिती होण्यासाठी ज्ञानार्जन क्रांतीची नक्कीच गरज आहे.” असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष नमन सावंत धावस्कर केले.पुढे मान्यवरांना स्मृतीचिन्हे भेट देण्यात आली आणि प्रा.दर्शना मांदेकर यांच्या आभार प्रदर्शनाने उद्घाटन सत्राची सांगता झाली.या सत्राचे सुत्रसंचालन मानसी मळीक हिने केले.
श्रीमती अन्व?षा सिंगबाळ यांनी युवा साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्याचबरोबर प्रा.रमा मुरकुंडे यांनी पुरस्कृत मान्यवरांची मुलाखत घेतली.प्रा.कुलदीप कामत यांनी या सत्राचे सुत्रसंचालन केले.पुढे जाहीर मुलाखतींचे “पडवेर” हे सत्र पार पडले.येथे श्री.देविदास कदम,श्रीमती माया खरंगटे,श्री.नागेश करमली यांच्या मुलाखती अनंत अग्नी आणि तन्वी कामत बांबोळकर यांनी घेतल्या.या सत्राचे सुत्रसंचालन प्रा.योगिता चोडणकर यांनी केले.पुढील सत्रामध्ये डा?.प्रकाश पर्येंकर यांनी बीज भाषण केले.या सत्राचे सुत्रसंचालन प्रा.कविता गावस यांनी केले.पुढे कवी संमेलन घेण्यात आले,श्री.शशिकांत पुनाजी हे कवी संमेलनाचे अध्यक्ष होते.सेजल तळसेकार,गोविंद मोपकार,एश्वर्या नायर,सान्वी खांडेपारकर,आकाश गांवकर,मानसी धावस्कर,साईश खोलकर,अद्वैत साळगावकर,ओमकार नायक,महादेव गांवकर यांनी आपल्या कवी या प्रसंगी सादर केल्या.या सत्राचे सुत्रसंचालन प्राजक्ता गांवकर हिने केले.पुढे सांस्कृतिक संध्येचे आयोजन करण्यात आले होते या सत्राचे सुत्रसंचालन प्रा.साईश नायक दलाल यांनी केले.









