प्रतिनिधी / मंडणगड
पाट गावाने शिमगोत्सवात पिढय़ान पिढय़ा जपलेली डेरा पंरपरेची संस्कृती कोकणात अनोखी आहे. विविध सांस्कृतीक पंरपरांनी कोकणचा शिमगोत्सव संपन्न झाला आहे. शहरापासून केवळ चार किलोमीटर अंतरावर असलेले पाट हे गाव गवळी समाज बांधवाचे गाव. गावातील ग्रामस्थांनी पिढय़ान पिढय़ा डेरा या पंरपरेच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण व राधेचे शिमगोत्सवाच्या निमीत्ताने स्मरण करण्याची पंरपरा जोपासली आहे. यात एका मोठय़ा मातीच्या मडक्यात लहान टोपला ठेवून मुख्य मडक्याला चामडे बांधून नाराळाच्या माडाच्या झावळीच्या पाती अडकवल्या जातात या पातीला मेण लावून हाताने ओढून त्यातून निर्माण होणाऱया आवाज व विशिष्ठ तालावर कृष्ण व राधेच्या जीवनातील विविध प्रसंगातील काव्य गायले जाते.
सजवलेल्या डेऱयाच्या वैशिष्ठपुर्ण आवाज व खेळी म्हणून जाताना खास सजवण्यात आलेले राधा कृष्णाची जोडी हे या संपूर्ण पंरपरचे वैशिष्ठ असून शिमगोत्सवात पुर्वी या गावातील लोक किमान आठ दिवस खेळी म्हणून जात असत. यात मंडणगड तालुक्यासह रायगड जिह्यातील म्हसळा, श्रीवर्धन, गोरगाव या तालुक्यातील अनेक गावांना खेळी भेट देत असत बदलत्या काळानासूसार आत आठ दिवस खेळी म्हणून बाहेर पडणे शक्य नसले तरी या पंरपरेचे रक्षणासाठी मोठय़ा होमाच्या एक दिवस आधी मंडणगड शहर परिसर व पाट गावामध्ये खेळी जाण्याची प्रथा अजूनही ग्रामस्थांनी जपलेली आहे.
गावातील चणचूणीत मुलांना या निमीत्ताने राधेच्या व कृष्णांचा उत्तम मेकअप केला जातो व सजवलेले राधाकृष्णा यांच्यासमवेत ग्रामस्थ प्रत्येक शहरातील प्रत्येक घरघरात जातात यानंतर डेऱयाला लावलेल्या पाती सजवलेले राधाकृष्ण आपल्या हाताने ओढतात यामुळे आवाज निर्माण होते या आवाजात गावातील जाणकार व वृध्द माणसे राधेचे व कृष्णाचे जीवनातील प्रसंगाचे काव्य म्हणू लागतात त्यांना अन्य ग्रामस्थ कोरस मध्ये साथ देतात बदलत्या काळात ढोलकी, शाहिरी डफ, खंजीरी व टाळ या वाद्यांची साथ ही दिली जाते पाच मिनीटांची छोटीखानी कार्यक्रम संपल्यावर घरातील यजमान गृहिणी मोठय़ा भक्ती भावाने आरतीच्या तबकात राधा कृष्णाची ओवाळणी करते. यानंतर ओवळणीची आरती प्रत्येक घरात केली जाते. मग पुढच्या घराचा प्रवास सुरु होतो.
यंदा 8 मार्च 2020 रोजी पाट गावाचा डेरा मंडणगड शहर परिसरात फिरला व रात्री उशीरा शहर परिसरातील सगळी घरी घेऊन पाट गावाच्या शिमगोत्सवाकरिता प्रयाण केले. बुधवार 11 मार्च 2020 रोजी पाट गावात शिमगोत्सवाचा मोठा कार्यक्रम आहे यात गावाची पालखी दिवसभर गावागावातील घराघरात फिरणार आहे पालखीसोबत डेरा सुध्दा फिरणार आहे. मंडणगड पंचायत समितीच्या सभापती सौ. प्रणाली संदेश चिले यांची गावाच्या शिमगोत्सवातील ही पंरपरा रत्नागिरी जिह्यातील एकमेव व कोकणाला वेगळी ओळख देणारी आहे.
डेरा या शिमगोत्सवाच्या खेळामध्ये पाट गावातील सर्व ग्रामस्थांचे योगदान लाभते. डेऱयासाठी आवश्यक नाराळाच्या पाती वसई येथून मागविल्या जातात. त्यांच्या रुंदी व जाड़ीवर डेऱयातून निघणारा आवाजाची पातळी अवलंबून असते. राधा कृष्ण प्रमाणेचे डेरा ही सजविला जात व एका ग्रामस्थास माडीत डेरा धरून बसवावे लागते. यानंतर हाताने पाती ओढून आवाज येतो. गावातील अनेक पिढय़ांनी ईश्वराच्या स्मरणाची ही पंरपरा जोपासली असून यातील काव्य ही पिढीदर पिढी चालत आलेले आहे. तेच काव्य आम्ही आजही गातो. नवीन गाण्यांचा या खेळात समावेश केला जात नाही .
ग्रामस्थ नथुराम महाडीक