प्रतिनिधी / खेड
गेल्या सव्वा वर्षापासून बंद असलेली वातानुकुलित डबलडेकर एक्स्पेस 2 ऑगस्टपासून पुन्हा कोकण मार्गावर धावणार आहे. गतवर्षीच्या 22 मार्चपासून कोकण मार्गावरून धावणाऱया डबलडेकर एक्स्पेसलाही ब्रेक लागला होता. कोकण मार्गावरून धावणाऱया नियमित गाड्यांसह विशेष गाड्यांची सेवा हळूहळू पूर्ववत होत असताना डबलडेकर एक्स्पेसही कोकणवासियांच्या सेवेत पुन्हा रूजू होणार आहे.
2 ऑगस्टपासून दर सोमवार व बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनसहून पहाटे 5.33 वाजता सुटेल. परतीच्या पवासात 3 ऑगस्टपासून दर मंगळवार व बुधवारी पहाटे 5 वाजता मडगावहून सुटेल. 7 ऑगस्टपासून दर शनिवारी रात्री 12.45 मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटेल. परतीच्या पवासात 8 ऑगस्टपासून दुपारी 12.15 मिनिटांनी मडगावहून सुटेल. या डबलडेकर एक्स्पेसला ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, थिविम, करमाळी आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
Previous Articleबारावी रिपीटर विद्यार्थी पास…
Next Article प्राथमिक आरोग्य केंद्रात कुरघोड्यांचे`राजकारण’









