25 जणांविरूद्ध गुन्हा दाखल, नंग्या तलवारी, रॉडने एकमेकांवर हल्ला
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील कोकणनगर पोलीस चौकीसमोर दोन गटात राडा होवून जोरदार धुमश्चक्रि उडाल़ी यावेळी नंग्या तलवारी व लोखंडी रॉडने एकमेकांवर हल्ला करण्यात आल़ा बुधवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास झालेल्या प्रकाराने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आह़े याप्रकरणी 5 जणांना पोलिसांनी अटक केली आह़े
उबेद निजामुद्दीन होडेकर (30, ऱा उद्यमनगर रत्नागिरी) व सैफअली उर्फ लल्लू खान यांच्या गटात हा राडा झाल़ा याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 25 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह़े यामध्ये उबेद होडेकर, आकिब आलीद काझी (30, ऱा गवळीवाडा रत्नागिरी), सुफियान शमी नागलेकर (ऱा गवळीवाडा रत्नागिरी), साहिल इकबाल खान (52, ऱा कोकणनगर), इलियाज उर्फ उल्लू गणी शेख (24, ऱा मच्छिमार्केट रत्नागिरी), भूषण बिपिंद्र सावंत (20, ऱा टीआरपी रत्नागिरी), अमेय मसुरकर, मुकद्दर जमादार, रहिस खान, सैफअली उर्फ लल्लू खान व अन्य 15 जणांविरूद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्ववैमनस्यातून हा राडा झाल्याचे प्राथमिक तपासामध्ये समोर आले आह़े बुधवारी सायंकाळी उबेद व लल्लू खान यांच्या गटामध्ये वाद झाला होत़ा याचा राग मनात ठेवून रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हे दोन्ही गट कोकणनगर पोलीस चौकीजवळ एकमेकांसमोर आल़े हल्ला करण्याच्या तयारीने आलेल्या दोन्ही गटांनी आपल्याजवळील तलवारी, रॉड, काठय़ा यांनी एकमेकांवर हल्ला चढविल़ा यावेळी जोरदार आरडा-ओरडा झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाल़ा
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाल़े मात्र त्यापूर्वीच या सर्व जणांनी त्याठिकाणाहून पोबारा केला होत़ा दरम्यान याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आह़े शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक राहूल घोरपडे यांनी बेकायदेशीर जमाव केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आह़े लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता मिळत असल्याने गुन्हेगारी पून्हा एकादा डोके वर काढत आह़े या घटनेमुळे उद्यमनगर येथे 2 वर्षापूर्वी झालेल्या गँगवॉरची आठवण शहर वासियांना झाली आह़े
जनता घरात आणि गुंड मोकाट
बुधवारी रात्री झालेल्या राडय़ामधील अनेक जणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आह़े त्यामुळे ‘जनता घरात तर गुंड मोकाट’ अशी अवस्था रत्नागिरी शहर परिसराची झाली आह़े शहरातील गुन्हेगारी कमी करण्याचे शहर पोलिसांचे प्रयत्न तोकडे पडत आहेत का असे प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहेत़ आता पोलीस चौकीसमोरच तलवारी व रॉडच्या सहाय्याने राडा झाल्याने गुन्हेगारांना पोलिसांचे भय राहिले नसल्याचे या घटनेतून दिसून येत़े









