प्रतिनिधी/ वाई
केंद्रीय माहिती अधिकार जन जागृती अभियनाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष ज्ञानेश्वर छबन गुरव आणी उपाध्यक्ष जनार्दन आनंदा चव्हाण यांच्या हस्ते दुर्गम व डोंगराळ भाग असलेल्या कोंढावळे व वासोळे ता, वाई येथील कातकरी समाजातील 50 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
सातारा जिह्यातील अनेक गावांमध्ये केंद्रीय माहिती अधिकार जन- जागृती अभियानांतर्गत पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष ज्ञानेश्वर छबन गुरव रा. मांढरदेव आणि उपाध्यक्ष जनार्दन आनंदा चव्हाण रा. पांडेवाडी व त्यांचे सहकारी कार्यकर्ते गेली कित्येक वर्षांपासून शासनाच्या विविध योजना पासून वंचित असणार्या दुर्गम भागातील गोरगरीब दिनदुबळ्या समाजातील लोकांच्या अडी अडचणी समजावून घेवून त्या समस्या शासन दरबारी मांडुन वंचितांना नेहमीच न्याय मिळवून देण्यासाठी सदैव झटताना दिसतात, अनेक गावांमध्ये दोन राजकीय गट असतात, त्या गटातील प्रमुख पदाधिकारी हे आपल्या मर्जीप्रमाणे वागणाया कार्यकर्तांनाच शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात, त्यामुळे वाई तालुक्यातील गरजू आणि गरीबांना हे प्रमुख कार्यकर्ते कधीही कुठल्याही प्रकारची शासकीय योजनांचा लाभ मिळवून देताना दिसत नसल्याने हे केंद्रीय माहिती अधिकार कार्यकर्ते सातारा जिह्यातील ग्रामीण भागात जाऊन त्यांचे प्रश्न सोडवून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतात, सध्या सातारा जिह्यातील सर्वच गावांमधुन लॉक डाऊनचा आणि संचार बंदीचा कायदा लागू असल्याने अनेक गरीबांच्या हातांना काम नसल्याने त्यांच्या कुटुंबांवर सध्या ऊपासमारी सारखे संकट कोसळले आहे, अशा कुटुंबांचा हे कार्यकर्ते शोध घेवून त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे स्वखर्चाने साहित्य पोच करण्याचे काम करताना दिसतात, वासोळे आणी कोंढावळे ता, वाई येथील कातकरी समाजातील जवळ पास 50 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटसह एक साडीचे वाटप करण्यात आले, या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ज्ञानेश्वर गुरव, जनार्दन चव्हाण, वासोळे गावच्या सरपंच सुजाता दानवले, ग्रामसेवक गोविंद लोखंडे, कृषी अधिकारी प्रशांत सोनवणे, बाजीराव नवघणे, बाळासाहेब कोंढाळकर, बाजीराव प्रभाकर नवघणे, रामचंद्र तुपे, सिताराम तुपे, बबन दानवले, मारुती नवघणे, संतोष नवघणे, कृष्णा नवघणे, तानाजी मांढरे, प्रकाश गोळे, कोतवाल दगडु तुपे, या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी सोशल डिस्टसिंगचा वापर केला.








