प्रतिनिधी / कणकवली
कोंडये येथील मयुरी मंगेश तेली (वय ४०) या विवाहित महिलेचा ओढ्यात वाहून मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. तिच्या सोबत असलेली १४ वर्षाची मुलगी सुदैवाने बचावली आहे. मृतदेह बुधवारी सकाळी आढळून आला आहे.या घटनेमुळे कोंडये गावावर शोककळा पसरली आहे.
मंगळवारी सायंकाळी ग्रामस्थांनी शोध मोहीम राबविली, पण रात्र झाल्याने शोध मोहीम थांबवली होती.बुधवारी ग्रामस्थांनी सकाळीच शोध मोहीम हाती घेतली. तिचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळून आला आहे.दरम्यान, कणकवली तहसिलदार रमेश पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. मंडळ अधिकारी निलिमा प्रभुदेसाई, तलाठी मारुती सलाम, ग्रामस्थ उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









