प्रतिनिधी / शिरोडा
कोंकण मराठा सांस्कृतिक संस्था, फोंडाच्या अध्यक्षपदी किरण नाईक राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संस्थेची सर्वसाधारण सभा नुकतीच होऊन पुढे दोन वर्षांसाठी नूतन समिती निवडण्यात आली. इतर पदाधिकारी पुढील प्रमाणे आहेत.
उपाध्यक्ष अरविंद गांवकर, सचिव मंजुनाथ कदम, सहसचिव प्रसाद पवार, खजिनदार सुरेश नाईक, सहखजिनदार हेमंत देसाई, कार्यकारी सभासद सत्यवान राणे, अशोक सावंत, गोविंदराव नाईक, महादेव नाईक, बाबू पवार, उल्हास कदम, उदय सैल, उदय राणे व संजीव नाईक. सल्लागार – आर. बी. देसाई, प्रभाकर नाईक, लींगू सावंत, एस. बी. नाईक व सावळो नाईक. 1994 सालापासून ही संस्था फोंडय़ात कार्यरत असून संस्थेतर्फे कोंकण मराठा समाजातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत, आरोग्य सेवेसंदर्भात संस्थेतर्फे विविध उपक्रम तसेच समाजबांधवांना विविध क्षेत्रात पुढे आणण्यासाठी संस्थेचे कार्य सुरु असल्याचे किरण नाईक राणे यांनी सांगितले.









