पहिल्या सहामाहीतील आकडेवारी सादर एफपीआय, एफडीआय गुंतवणुकीचाही समावेश
नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या महामारीमुळे अर्थव्यवस्थेची चाके मंदीचा प्रवास करत होती. परंतु दुसऱया बाजूला काही प्रमाणात अर्थव्यवस्था सावरण्यासाठी प्रयत्न केले जात होते. यामध्ये चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीमध्ये कॉर्पोरेट बॉण्ड इश्यू बाजार 25 टक्क्यांनी वधारुन 4.43 लाख कोटींच्या घरात पोहोचल्याची नोंद केली आहे.
यासंदर्भात नुकत्याच सादर केलेल्या माहितीनुसार मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 3.54 लाख कोटी रुपयांचे कॉर्पोरेट बॉण्ड सादर केले होते. अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोविडच्या प्रभावामुळे सर्व अर्थव्यवस्थांमध्ये गुंतवणुकीचा प्रवास मोठय़ा प्रमाणात प्रभावीत राहिला आहे. याच पातळीवर मागणी आणि पुरवठा याचाही आलेख घसरला आहे.
भारत सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक प्रवाह कायम राहावा यासाठी सकारात्मक रचना तयार केलेली आहे. ही बाब विदेशी गुंतवणूक (एफपीआय), थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) आणि कॉर्पोरेट बॉण्ड यांच्यातील होत असणाऱया उलाढालीतून स्पष्ट होत असल्याचेही यावेळी सांगितले आहे.
दुसऱया तिमाहीतील प्राप्त गुंतवणूक
दुसऱया तिमाहीतील देशातील एफडीआय गुंतवणूक 28.10 अब्ज डॉलर्सवर राहिली आहे. ज्यामध्ये इक्विटीमध्ये एफडीआय 23.44 अब्ज डॉलर म्हणजे 1,74,793 कोटी रुपये आले आहेत.
2019-20 मधील कालावधीच्या दरम्यान हा आकडा 15 टक्क्यांनी अधिक राहिल्याची नोंद आहे.









