लवचिकतेचा सुखद अनुभव देणारी ‘फोर-वे स्ट्रेच’ ट्राउजर्स श्रेणी ग्राहकांच्या भेटीला
प्रतिनिधी / बेळगाव
सुती वस्त्रप्रावरणांच्या म्हणजेच अस्सल कॉटन गार्मेंटच्या क्षेत्रात देशातील अव्वल आणि विश्वसनीय असलेला ब्रँड म्हणजेच कॉटनकिंग. आपल्या ग्राहकांसाठी सातत्याने नवे काही घेऊन येण्याची परंपरा कॉटनकिंगने यंदाही जपली असून यावेळी ‘फोर-वे स्ट्रेच’ ट्राउजर्स ही खास श्रेणी ग्राहकांच्या भेटीस आणली
आहे.
चार विविध फिटिंग्जमध्ये उपलब्ध
‘फोर-वे स्ट्रेच’ या नव्या श्रेणीची वैशिष्टय़े म्हणजे चारही बाजूने मिळणारी लवचिकता (फ्लेक्सिबिलिटी) आणि कॉटनचा आरामदायीपणा (कम्फर्ट) यामुळे या श्रेणीतील ट्राउजर्स दैनंदिन वापरास अत्यंत सोयीस्कर आहेत. यात वापरण्यात आलेल्या कॉटनवर विशेष प्रक्रिया करून त्यास आणखी सॉफ्टनेस देण्यात आला आहे. त्यामुळे ‘फोर-वे स्ट्रेच’चय ट्राउजर्सचे डेनिमसारखे फिटिंग आहे. फॉर्मल, नॅरो फिट, प्लेटेड आणि नॉनप्लेटेड अशा चार विविध फिटिंग्जमध्ये त्या उपलब्ध आहेत. इतकेच नव्हे तर निरनिराळय़ा 13 रंगप्रकारांत या ट्राउजर्स उपलब्ध असल्याने त्यास युवावर्गालाही निवडीसाठी मोठी व्हरायटी लाभली आहे.
याबाबत बोलताना कॉटनकिंगचे संचालक कौशिक मराठे म्हणाले की, कॉटनकिंगच्या सर्व दालनांमध्ये आता ‘फोर-वे स्ट्रेच’ उपलब्ध झाल्या असून त्यास ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो आहे.
कॉटनकिंगची गुणवत्ता, उत्पादन नाविन्यता आणि ‘व्हॅल्यू फॉर मनी’ धोरण यामुळे आजवर ग्राहकांकडून लाभलेला विश्वास आम्हाला सातत्याने आघाडीवर ठेवतो. नवे काही देण्याची प्रेरणा देतो. म्हणूनच ‘फोर-वे स्ट्रेच’ ही श्रेणी ग्राहकराजाला निश्चितच भावेल, स्वत: वापरण्यासाठी तसेच आप्तजनांना भेट देण्यासाठीही कॉटनकिंगमधील खरेदी ग्राहकांना खरा आनंद मिळवून
देईल.









