नवी दिल्ली
कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कॉर्पला नव्या सीएमडी अर्थात चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टरची नव्याने नियुक्ती करायची आहे. कंपनीने या पदासाठी योग्य व्यक्तीचा शोध चालू केला असल्याचे समजते. यापूर्वी रामकुमार रामामूर्ती हे पद सांभाळत होते. दरम्यान मागच्या आठवडय़ात रामकुमार रामामूर्ती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली होती. जवळपास 35 वर्षे ते संस्थेत सेवा बजावत होते. त्यांच्या जागी आता नव्या व्यक्तीचा शोध सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.









