प्रतिनिधी/ म्हापसा
कोलवाळ मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगत ख्ंाडणी बहाद्दर विवेक कुमार गौतम उर्फ आर्यन प्रमोदकुमार याला म्हापसा जिल्हा आझिलो इस्पितळात उपचारासाठी नेले असता त्याने आपल्या इतर दोघा साथीदारासमवेत फिल्मी स्टाईलने पळ काढला. पोलीस व त्याच्यामागे झालेल्या झटापटीत त्याने पोलीसांवर पेपर स्प्रेचा वापर केला त्याचा पाठलाग करण्याऱया पोलीस एस्कॉर्ट शिपायांवर गोळीबार केला. मात्र शिपाई दैवबलवत्तर म्हणून वाचला होता. या तिघांना येथील सत्र न्यायालयात हजर केले असता तिघांही संशयित आरोपीना 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
या प्रकरणात पलायन केलेला आरोपी विवेककुमार गौतम, त्याची पत्नी पुजा कानवर रघुवंशी (29), भाऊ मोहीतकुमार गौतम यांचा समावेश आहे. दरम्यान उत्तार गोवा पोलीस अधीक्षक उत्कृर्ष प्रसन्नू यांनी म्हापसा पोलीस स्थानकात भेट देऊन आरोपीबाबत माहिती जाणून घेतली. दरम्यान याबाबत पत्रकारांशी बोलताना अधीक्षक म्हणाले की, आरोपीना कोठडीत घेऊन त्यांची चौकशी करण्यात येईल, याकडे सर्व बाजूनी चौकशी सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान या गुन्हात विवेक यांच्या पत्नीचा हात असल्याचे बोलले जात आहे तर त्याचा भाऊ मोहीत गौतम हा स्प्रे मारण्यासाठी होता याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत. आग्रा येथे पूर्वनियोजित कट आखून हा पद्धतशीरपणे कृत्य केलेले आहे.









