वृत्त संस्था/ अल मॅसनेह (ओमान)
मंगळवारी येथे झालेल्या आशियाई नौकानयन स्पर्धेत 49 ईआर प्रकारात भारताचे नौकानयनपटू केसी गणपती आणि वरूण ठक्कर या जोडीने सुवर्णपदक पटकाविले. अलीकडेच झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय नौकानयनपटूंची कामगिरी समाधानकारक झाली नव्हती.
गणपती आणि ठक्कर या भारतीय नौकानयनपटूंना टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वकष दहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. दरम्यान या ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्या दहा क्रमांकात स्थान मिळविणारा आशिया खंडातील भारत हा एकमेव देश होता. आशियाई नौकानयन स्पर्धेच्या इतिहासात भारताचे हे तिसरे पदक आहे. 2018 साली भारताने सुवर्ण तर 2019 साली झालेल्या या स्पर्धेत रौप्य मिळविले होते. ओमानमध्ये 16 ते 21 नोव्हेंबर दरम्यान होणाऱया विश्व नौकानयन स्पर्धेत वरूण ठक्कर आणि केसी गणपती सहभागी होणार आहेत.









