ओटवणे / प्रतिनिधी-
केसरी गावचे सुपुत्र तथा कोल्हापूर येथील गुरुवार व मंगळवार पेठ येथील ओंकार कम्युनिकेशनचे मालक उमेश सावंत यांच्यावतीने कोल्हापूर शहरातील तृतीय पंथीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.
उमेश सावंत यांचे केसरी गावच्या धार्मिक व सामाजिक कार्यातही सक्रिय योगदान असते. लॉकडाऊनमध्ये समाजातील सर्व घटकां प्रमाणेच तृतीयपंथीयानाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यामूळे त्यांची ही गैरसोय लक्षात घेऊन उमेश सावंत व त्यांचे सहकारी सुनील गुंडेशा यांनी तृतीयपंथीयांना तांदूळ, गव्हाचे पीठ, तेल, साखर, चहा पावडर, रवा, पोहे, मीठ, आदी जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले. यावेळी तृतीयपंथीयानी उमेश सावंत आणि सुनील गुंडेशा यांचे आभार मानले.









