वृत्तसंस्था/ लंडन
प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत मँचेस्टर सिटी संघाकडून खेळणारा बेल्जियमचा फुटबॉलपटू केव्हिन डी ब्रुईन याने सलग दुसऱयांदा व्यावसायिक फुटबॉलपटू संघटनेच्या सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार मिळविला.
डी ब्रुईनच्या शानदार कामगिरीच्या जोरावर मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लबने गेल्या चार फुटबॉल हंगामात तिसऱयांदा प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. तसेच मँचेस्टर सिटीने लीग चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली आहे. 29 वर्षीय ब्रुईनच्या शानदार कामगिरीमुळे त्याची सलग दुसऱयांदा पीएफएतर्फे सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून निवड करण्यात आली आहे.









