प्रतिनिधी/ रत्नागिरी
बीएसएनएल कनेक्शन केवायसी अपडेट करायची असल्याची बतावणी करून 69 हजाराचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आह़े ही घटना 9 जानेवारी 2021 रोजी घडल़ी याप्रकरणी मयुरेश अशोक शेवडे यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आह़े
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयुरेश यांना शनिवारी दुपारी अज्ञात इसमाने फोन केला होत़ा त्यावेळी या इसमाने तुमचे बीएसएनएल कनेक्शन केवायसी करायचे आहे असे सांगितल़े तसेच त्यांच्या मोबाईलवर लिंक पाठवून मयुरेश यांच्या बँक खात्यातील 69 हजार रूपये काढून घेतल़े दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मयुरेश यांनी तक्रार दाखल केली आह़े









