प्रतिनिधी / कसबा बीड
सावर्डे दुमाला तालुका करवीर येथे फक्त सात माणसांच्या उपस्थित विवाह सोहळा पार पडला. यावेळी वधू वरां कडून कोरोना जिल्हा आपत्ती कार्यालयास 11,111 रुपयाचा धनादेश मदत स्वरूपात देण्यात आला. कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवरती शासनाने सर्व कार्यास निर्बंध घातले आहेत. या नियमांचे पालन करत केवळ सात व्यक्तींच्या मुलांकडील तीन व मुलगी कडील तीन आणि विवाह संपन्न करणारे पुरोहित यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्स च्या बॉक्समध्ये उभे राहून वधू-वरांवर अक्षता टाकण्यात आल्या.
विवाह सोहळ्यास गर्दी नको म्हणून वराचे आजी, आजोबा, चुलते यांनी मंदिराकडे न येता घरात राहूनच अक्षता टाकल्या. तसेच वराच्या भावानेही व्हिडीओ कॉलिंगद्वारेच अक्षता टाकूनच आशीर्वाद दिले.