प्रतिनिधी / बेंगळूर
निष्ठांवत कार्यकर्त्यांना ओळखून त्यांना विविध पदांवर संधी देण्याची व्यवस्था केवळ भारतीय जनता पक्षामध्ये आहे. निष्ठा, प्रामाणिकपणा आणि विश्वासाला भाजप अधिक प्राधान्य देतो, असे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले.
बुधवारी बेंगळूरच्या लालबाग येथील डॉ. एम. एच. मरीगौड सभागृहात राज्य आंबा विकास आणि बाजारपेठ विकास निगमच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या के. व्ही. नागराजू यांच्या पदग्रहण समारंभात ते बोलत होते.
मंत्री सुधाकर पुढे म्हणाले, पक्षातील सर्व कार्यकर्त्यांच्या परिश्रमाकडे बारकाईने लक्ष ठेवले जाते. प्रत्येकाला संधीनुसार प्राधान्य दिले जाते. सर्वांना एकाचवेळी संधी देणे शक्य नाही. मात्र, सर्वांना एका वेळेस तरी संधी मिळतेच. आगामी ग्रामंचायत निवडणुकीत स्थानिक नेत्यांना संधी दिली जात आहे. उमेदवार तुम्हीच निवडावा. सुशिक्षित, समाजाचा विकासासाठी झटणाऱयांची निवड केल्यास गावाचा विकास होणे शक्य आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी आंबा विकास निगमचे माजी अध्यक्ष गोपालकृष्ण, रामलिंगप्पा, चन्नकृष्णा रेड्डी, नारायणस्वामी, नंजुंडप्पा, निगमचे व्यवस्थापक सचिव नागराजू यांच्यासह आंबा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.









