प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनमुळे घरपट्टी भरण्याचे बंद ठेवण्यात आल्याने दि. 20 मे पर्यंत केवळ 3 कोटी घरपट्टी वसूल झाली होती. मात्र लॉकडाऊन शिथील झाल्याने बेळगाव-वन सह ऑनलाईनद्वारा घरपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने गेल्या आठ दिवसात सहा कोटीची घरपट्टी जमा झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत नऊ कोटी घरपट्टी जमा झाली आहे.
घरपट्टीत व कचरा व्यवस्थापन शुल्कात वाढ करण्यात आल्याने घरपट्टी भरण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तरी देखील पाच टक्के सवलतीसाठी नागरीक घरपट्टी भरीत आहेत. एप्रिल महिन्यात पाच टक्के सवलत देण्यात येते. पण लॉकडाऊनमुळे घरपट्टी भरता आली नाही. त्यामुळे 31 मे प्रर्यंत सवलतीची मुदत वाढविण्यात आली होती. त्यामुळे 20 मे पर्यंत महापालिकेच्या खजिन्यात केवळ 3 कोटीची रक्कम जमा झाली होती. मात्र लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही व्यवहारांना मुभा देण्यात आली. तसेच 20 मे पासून बेळगाव- वन कार्यालय सुरू करण्याकरीता परवानगी देण्यात आली. त्यामुळे घरपट्टी भरण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे मागील आठ दिवसात बेळगाव वनच्या माध्यमातून चार कोटी छत्तीस लाख रूपये घरपट्टी शहरवासीयांनी जमा केली आहे. तसेच ऑनलाईनद्वारा चार कोटी पन्नास लाख जमा झाले आहेत. पेटीएमला थंडा प्रतिसाद असल्याने या दोन महिन्यात केवळ 19 लाख रूपये जमा झाले आहेत. आतापर्यंत 2020-21 आर्थिक वर्षाची 9 कोटी घरपट्टी जमा झाली आहे. या वर्षात 45 कोटी घरपट्टी वसूल करण्याचे उद्दी÷ आहे. पण घरपट्टीत वाढ करण्यात आली आहे. तसेच लॉकडाऊनमुळे नागरिकांचे व्यवहार ठप्प झाले असल्याने घरपट्टी भरण्यास नागरिकांचा थंडा प्रतिसाद आहे. त्यामुळे नगरविकास खात्याने 5 टक्के सवलतीच्या मुदतीत वाढ केली आहे. दि. 31 जुलै पर्यंत मुदत वाढ केली असून, कर भरण्यास विलंब केल्यास दि. 1 नोव्हेंबर पासून 2 टक्के दंड आकारणीस प्रारंभ करण्यात येणार आहे.
त्









