दापोली/ प्रतिनिधी
दापोली तालुक्यातील केळशी समुद्राला आलेल्या भरतीमुळे पर्यटकांची गाडी बुडाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ओहोटी आल्यानंतर ही गाडी ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आली.
समुद्रकिनाऱयावर वाहने आणू नयेत, चालवू नयेत अशा सूचना देऊनही पर्यटकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यातूनच अनेकवेळा अपघात घडतात. केळशी, आंजर्ले, मुरूड, कर्दे हे समुद्रकिनारी याच बेफिकिरीतून सुरक्षेला गालबोट लावले जात आहे. रविवारी केळशी येथील समुद्रकिनाऱयावर काही हौशी पर्यटकांनी गाडी आणली होती, समुद्राला भरती आल्याने ती समुद्रात ओढली गेली. यावेळी पर्यटकांनी आरडाओरडा केला, परंतु तोपर्यंत गाडी समुद्राच्या पाण्यात जाऊन पुळणीत रूतून बसली होती. ओहोटी लागल्यानंतर गावातील तरूणांनी गाडी पाण्यातून बाहेर काढली.









