दोडामार्ग / वार्ताहर :
आदर्श गाव केर-भेकुर्ली ग्रामपंचायतीचे कार्यालय रविवार दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता नूतन इमारतीत स्थलांतरीत होत आहे. त्यानिमिताने नूतन इमारत उद्घाटन सोहळा व सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर सह कार्यक्रम अध्यक्ष स्थानी जि. प. अध्यक्षा संजना सावंत, प्रमुख पाहुणे जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती अनिशा दळवी, जि. प. सदस्या संपदा देसाई, पं. स. सभापती संजना कोरगावकर, उपसभापती सुनंदा धर्णे, पं. स. सदस्य बाबुराव धुरी, लक्ष्मण नाईक, धनश्री गवस, गणपत नाईक, तहसीलदार अरुण खानोलकर, गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, पोलीस निरीक्षक आर. जी. नदाफ आदी उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच मिनल देसाई, उपसरपंच महादेव देसाई, ग्रा. पं. सदस्य तसेच आजी माजी सरपंच, उपसरपंच व सदस्य ग्रुप ग्रामपंचायत केर – भेकुर्ली यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









