गुरुवारी 572 बाधित, 17 बळी
प्रतिनिधी / पणजी
राज्यात कोरोनाबाधित आणि बळींची संख्याही समाधानकाररित्या नियंत्रणात येत आहे. गुरुवारी 572 बाधित सापडले तर 17 जणांचे बळी गेले आहेत. सक्रिय रुग्णसंख्या 9700 वर पोहोचली आहे.
राज्यातील एकूण बाधितसंख्या 157847 वर पोहोचली आहे तर गत 24 तासात बरे झालेल्या 1695 रुग्णांसह एकूण 145437 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 3331 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यातील 572 बाधित सापडले. त्यापैकी 90 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले तर 482 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. बरे होण्याचे प्रमाण 91.40 टक्क्यांवर पोहोचले आहे. एकूण बळींची संख्या 2693 तर गुरुवारी बळी गेलेल्या 17 जणांसह एकूण बळींची संख्या 2710 वर पोहोचली आहे. या 17 जणांपैकी 10 जण गोमेकॉत व दोघे दक्षिण जिल्हा इस्पितळात दगावले आहेत. त्याशिवाय उत्तर आणि दक्षिण गोव्यातील खासगी रुग्णालयात प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला. अन्य एका रुग्णाचा ईएसआय इस्पितळात मृत्यू झाला. या मृतांमध्ये 36 पासून 84 वर्षे वयोगटातील 10 पुरुष आणि 7 महिला रुग्णांचा समावेश आहे. या बळींपैकी एकाने कोरोनाची पहिली लस घेतली होती, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
मडगावात 803 रुग्ण
सर्वाधिक रुग्णसंख्या असणाऱया मडगाव केंद्रातील रुग्णही बऱयापैकी कमी होत असून गुरुवारी तेथे 803 रुग्ण होते. राज्यातील 33 पैकी 2 केंद्रांतील रुग्णसंख्याही आता दोन अंकी संख्येवर पोहोचली आहे. त्यातील मये केंद्रात 92 आणि कासारवर्णेत 75 रुग्ण आहेत.
केंद्रवार सक्रिय रुग्णसंख्या
डिचोली 195
सांखळी 309
पेडणे 396
वाळपई 289
म्हापसा 276
पणजी 484
हळदोणा 163
बेतकी 225
कांदोळी 376
कासारवर्णे 75
कोलवाळ 332
खोर्ली 264
चिंबल 382
शिवोली 204
पर्वरी 395
मये 92
कुडचडे 386
काणकोण 202
मडगाव 803
वास्को 330
बाळ्ळी 239
कासावली 336
चिंचिणी 171
कुठ्ठाळी 378
कुडतरी 247
लोटली 269
मडकई 196
केपे 200
सांगे 175
शिरोडा 194
धारबांदोडा 196
फोंडा 715
नावेली 206
प्रवासी एकही नाही
03 जूनपर्यंतचे एकूण रुग्ण 157847
बरे झालेले रुग्ण 145437
सक्रिय रुग्ण 9700
नवीन रुग्ण 572
बरे झालेले रुग्ण 1695
कोरोना बळी 17
वर्षभरातील एकूण बळी 2710









