केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या मासिक स्पर्धेचा बनला विजेता

प्रतिनिधी /वाळपई
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून सुरू असलेल्या जलनायक / नायिका ः सांगा तुमच्या कहाण्या या स्पर्धेचा निकाल जाहीर केला असून यामध्ये दिव्यांश टंडन (मीरत), विनय विश्वनाथ गावस (केरी सत्तरी), अमित (उत्तर प्रदेश), बबीता राजपूत घुवारा (मध्य प्रदेश), अनुराग पटेल (बांदा), स्नेहलता शर्मा (शिवपुरी) यांचा विजेत्या स्पर्धकांमध्ये समावेश आहे.
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या अखत्यारितील जलस्त्राsत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने ‘जल नायक/नायिकाःसांगा तुमच्या कहाण्या स्पर्धे’ची सुरुवात केली आहे. यातील तिसरी स्पर्धा मायगव्ह पोर्टलवर 1 डिसेंबर 2021 रोजी सुरु झाली असून ती 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत चालणार आहे. दुसरी स्पर्धा 19 सप्टेंबर 2020 रोजी सुरु होऊन 31 ऑगस्ट 2021 रोजी संपली.
जल-संधारण तसेच जल-स्त्राsतांच्या शाश्वत विकासासाठी सुरु असलेल्या देशव्यापी प्रयत्नांना पाठबळ पुरविणे आणि पाण्याचे महत्त्व जनतेत रुजविण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना उत्तेजन देणे हा या स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश आहे.
ऑगस्ट 2022 या महिन्यासाठी या स्पर्धेच्या खालील सहा विजेत्यांची निवड करण्यात आली असून त्यांना पारितोषिक म्हणून दहा हजार रुपये रोख आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
असा केला विशेष प्रकल्प
विनय गवस गोव्यातील केरी सत्तरी परिसरातील केळवदे गावात छतावरील पर्जन्य जल संधारण आणि कूप-नलिका पुनर्भरण याकरिता सुरु केलेल्या अभियानाचे प्रकल्प संचालक आहेत. टीईआरआय या संस्थेच्या सहकार्यातून हा प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पाला गोवा सरकारच्या जलसिंचन खात्याचे महत्त्वाचे सहकार्य लाभले होते. अनेकांनी त्यांना चांगले योगदान दिले होते. मध्यंतरी गोवा जलसिंचन खात्याचे प्रमुख अभियंता प्रमोद बदामी व वरि÷ अधिकाऱयांनी यात भेट देऊन त्यांच्या एकूण प्रकल्पासंदर्भात त्यांच्या अभिनंदन केले होते. पावसाळी मोसमामध्ये मोठय़ा प्रमाणात पाण्याचा साठा वाया जात असतो?. हा पाण्याचा साठा या प्रकल्पाच्या माध्यमातून संवर्धन करून ठेवल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. भूगर्भामध्ये पाण्याची पातळी कमी होत असते. मात्र पाण्याचे संवर्धन भूगर्भामध्ये केल्यास त्याच्या दुरगामी अनुकूल परिणाम होऊ शकतात. या संदर्भात त्यांनी प्रकल्प राबविला आहे.
ही स्पर्धा मासिक तत्वावर भरविली जात असून तिची माहिती मायगव्ह या पोर्टलवर उपलब्ध आहे. या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱया स्पर्धकांनी त्यांच्या 1 ते 5 मिनिटांच्या कालमर्यादेतील व्हिडिओच्या स्वरूपातील जल संधारणाशी संबंधित यशोगाथा साधारण 300 शब्दांच्या लेखी वर्णनासह आणि त्यांचे कार्य दर्शविणाऱया काही फोटोंसह या पोर्टलवर पाठविणे अपेक्षित आहे.









