वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोनाच्या उद्रेकाचे कारण स्पष्ट करत केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील राज्यसभेची पोटनिवडणूक पुढे ढकलली आहे. केरळ काँग्रेस मनी गटाचे नेते जोस के. मनी यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले आहे. पद रिक्त झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत ते भरले पाहिजे असा नियम आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने निवडणूकीसाठी हालचाल सुरु केली होती. तथापि, कोरोनाच्या उद्रेकामुळे विधानसभेतील आमदारांना एकत्र बोलावून त्यांचे मतदान घेणे अशक्य असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.









